Uncategorized

खाजगी शिक्षक व नोकर भरतीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अर्धनग्न आंदोलन

करमाळा (युवापर्व) :वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व युवक सम्राट सुजात आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज करमाळा येथे वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेच्या वतीने राज्य सरकारने घेतलेल्या बहुजन विरोधी निर्णयांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले .

यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ, जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, जिल्हा संघटक विलास कांबळे , तालुकाध्यक्ष नवनाथ साळवे, ता. महासचिव नंदू कांबळे, शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, तालुका संघटक शिवाजी भोसले, शहर उपाध्यक्ष जितेश रणबागूल, उपाध्यक्ष यशवंत कांबळे, बौद्धचर्या सावताहरी कांबळे, सचिन घोडके, बाळु गायकवाड, औदुंबर पवार ,रमेश पोकळे, विनोद धेंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button