आपला जिल्हाआपला तालुकासमाजकारण

बोरगाव येथे भाजपा,जनक्रांती संघटना आयोजित इफ्तार पार्टी संपन्न

बोरगाव (युवापर्व) : माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील यांच्यावतीने करण्यात आले होते. बोरगाव येथील पाटील कुटुंबीयांकडून गावांतील सर्व मुस्लिम बंधु-भगिनींना रोजा इफ्तार पार्टी व स्नेहभोजन दिले जाते. ग्रामीण भागात हिंदु-मुस्लिम बंधुभाव व ऐक्याचे प्रत्यक्ष दर्शन यावेळी येथे दिसून आले. सालाबादप्रमाणे रमजान महिन्यात राजकुमार पाटील यांच्या पूर्वजापासून अखंडीत सुरु असलेले मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजन आजही अविरतपणे सुरु आहे.

हिंदु-मुस्लिम बांधवांना एकजूट ठेवणारा हा सण असून नाईक-निंबाळकर कुटुंबीयांवर मुस्लिम समाजाने खूप प्रेम केले आहे. मुस्लिम समाजाच्या काहीही अडचणी असल्यास नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू असे अभिवचन खा. रणजितसिंहांनी दिले.यावेळी खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सर्व हिंदु-मुस्लिम बांधवांना ईदच्या व अक्षयतृतीयतेच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास माढा लोकसभेचे संयोजक जयकुमार शिंदे, माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, तसेच बोरगावसह पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button