संविधान दिनीच लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम ; उपोषण संपेपर्यंत कारखान्याचे चेअरमन नाॅट रिचेबल
खुडूस (युवापर्व) : माळशिरस तालुक्यातील अकलूजच्या सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. इतर कारखान्याबरोबर पहिले उचल कमी दिली परंतु यावर्षीचा चालू दर एफआरपीप्रमाणे व्यापारी प्रमाणे देऊ असे पत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी दिले.
खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणण्यास हरकत नाही हे पत्र देण्याचे चेअरमन, संचालक,कार्यकारी संचालक यांनी सध्या टाळले. आगामी काळात काट्याच्या ना हरकत प्रमाणपत्रावर आवाज नक्कीच उठवणार असल्याचे प्रा.सतिश कुलाळ यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये शेतकरी बांधव, शेतकरी युवा मित्र,शेतकरी संघटनेचे नेते सहभागी झाले होते. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी कारखान्याच्या चेअरमनाने घरात बसून अनेक ठिकाणी रिमोट चालवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी स्वतः उपोषणकर्त्याला भेट देण्याचे टाळलं हेच खरं कारखान्याच्या विकासाला न शोभणारी गोष्ट आहे या आंदोलनातून स्पष्ट दिसून आले. उपोषण मागे घेण्यात येत असताना कारखान्याचे चेअरमन नॉट रिचेबल राहिले व त्यांनी अनेक प्रकारे हे उपोषण व आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.
सहकार महर्षी कारखान्याच्या ६१ वर्षाच्या इतिहासामध्ये कोणत्याही संघटनेकडून आंदोलन,उपोषण करण्यात आलेले नव्हते. परंतु युवासेना नेते सतीश कुलाळ यांनी या उपोषणाच्या माध्यमातून सभासदांची नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आत्मविश्वास द्विगुणी वाढला आहे. उपोषण संपेपर्यंत चेअरमन नॉट रिचेबल असून संविधान दिनीच लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम सहकार महर्षीच्या चेअरमन यांनी केले आहे व आंदोलकांना भेट देण्याचे टाळले. ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे राज्याचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्या विनंती अनुसार हे आंदोलन स्थगित केले असून वजन काट्याचे ना हरकत पत्र देण्याचे तूर्तास तरी टाळले आहे.