शिकवणे सोपे आहे ; विद्यार्थ्यांना समजावून सांगणे अवघड आहे – संस्कार सरक
पिलीव : शिक्षक हा समाजाचा आरसा आहे. शिकवणे फार सोपे आहे परंतु विद्यार्थ्यांना समजून सांगणे तितकेच अवघड आहे असे प्रतिपादन बारावी विज्ञान चा विद्यार्थी शिक्षक म्हणून शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलत होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.कुमार लोंढे म्हणाले, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रति व शिक्षकांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.स्त्री शिक्षणाचा पाया,बहुजन मुलांना शिक्षण व विज्ञानवादी दृष्टीकोण हा महात्मा फुले यांचा विचार स्वीकारून विद्यार्थ्यांनी ठरवावे खरा शिक्षक दिन कोणाचा साजरा करावा? असे परखड मत डॉ.लोंढे यांनी व्यक्त केले.
सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज,चांदापुरी या ठिकाणी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकाची भूमिका बजावली. दहावीचा विद्यार्थी सुरज जाडकर मुख्याध्यापक तर बारावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी शामल दनाने,भाविका कोपनर,सानिया कांबळे, गणेश साठे यांनी प्राध्यापक म्हणून गणित, विज्ञान, मराठी, फिजिक्स, केमिस्ट्री बायोलॉजी, इतिहास हिंदी इत्यादी विषय शिकवले.
शिक्षक दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांनी शिक्षक यांना भेट वस्तू दिल्या तसेच बारावीचा विद्यार्थी ओंकार तांबवे व आठवी ची अक्षरा लोंढे यांनीही शिक्षकांना भेट म्हणून मिठाईचे वाटप केले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्राचार्य के साठे,प्रा.व्ही देवकाते,प्रा.एन सरक, प्रा.ए पठाण ,अरुणा मॅडम, धुमाळ सर, आकाश सरतापे सर इ उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पायल कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन संस्कार सरक यांनी केले.