डॉ. उषा भोईटे पवार यांची नेपाळ येथे होणाऱ्या अक्षरविश्वव साहित्य संमेलनासाठी निवड
नेपाळ येथे संपन्न होणार तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन

अकलूज (युवापर्व) : स्नेहल आर्टस् अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली आयोजित “तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन” दिनांक ११ ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत नेपाळची राजधानी काठमांडू येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन, पुस्तक प्रकाशन, व्याख्यान , परिसंवाद, गझल व कविता संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम असणारे साहित्य संमेलन संपन्न होणार असून ‘बकुळगंधकार’ व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कवी श्री. राजन लाखे सर हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक व प्रसिद्ध एकपात्री कलाकार व कवी मा.श्री. मकरंद गोंधळी हे असणार आहेत. इंडोनेशिया व दुबई येथील यशस्वी आयोजना नंतर हे तिसरे अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलन नेपाळ येथे संपन्न होणार आहे. संमेलनाच्या आयोजिका सौ. कल्पना गवरे (UK) स्नेहल आर्टस् अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवलीच्या अध्यक्षा असून मा.श्री. रविंद्र सोनवणे (पनवेल) हे नियोजन समिती अध्यक्ष आहेत. माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तसेच शिक्षण तज्ञ मा. श्री.अनिल गुंजाळ हे परिस॔वाद अध्यक्ष म्हणून भूमिका बजावणार आहेत. कवी व गझल कट्टा प्रमुख कवी बबन धुमाळ भूमिका बजावणार आहेत, कवी लेखक डॉ. संजय जगताप पुणे (नियोजन समिती समन्वयक)हे या संमेलनाचे सुत्र संचालन करणार आहेत.
संमेलनाच्या प्रथम सत्रात दीप प्रज्वलन, ईशस्तवन ,उद्घाटन, पुस्तक प्रकाशन, अतिथी सन्मान, अतिथी मनोगत मा. .श्री. मकरंद गोंधळी यांचे व्याख्यान व मा. राजन लाखे यांचे अध्यक्षीय मनोगत असा कार्यक्रम असणार आहे. द्वितीय सत्रात परिसंवाद ” मराठी साहित्यावर होणारा सोशल मीडियाचा परिणाम” होणार असून त्याचे प्रमुख मा. अनिल गुंजाळ असणार आहेत. परिसंवादात प्रमोद मकासिरे, विवेकानंद मराठे, रवींद्र सोनवणे, डॉ संजय जगताप, डॉ.उषा भोईटे पवार श्री नंदकुमार पवार आणि गंगाधर रासगे सहभागी असणार आहेत. स्नेहभोहजनानंतरच्या तिसऱ्या सत्रात “बकुळगंध फुलताना” या विषयावर बकुळगंध पुस्तकाचा प्रवास मा.राजन लाखे त्यावरील भाष्यातून उलगडणार आहेत. यावेळी ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची गीते सादर होणार आहेत. संमेलनाच्या चौथ्या सत्रात काव्य व गझल कट्टा कवी मा बबन धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली रंगणार आहे. याचे सूत्रसंचालन गझलकार रविंद्र सोनवणे करणार आहेत.संमेलनाच्या पाचव्या अंतिम सत्रात सर्व सहभागी साहित्यिक कवी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर संमेलनाचे समन्वयक संजय जगताप हे आभार प्रदर्शन करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. साहित्यिक डॉ. कलिंद बक्षी (USA) सोबत डॉ. किन्नरी बक्षी (USA), साहित्यिक श्री.विवेकानंद मराठे व सोबत सौ.स्नेहा मराठे, ठाणे, गझलकारा सौ.मीना शिंदे सोबत श्री.संजय शिंदे, (पुणे) , लेखिका डॉ. सौ. उषा भोईटे पवार आणि उपक्रमशील शिक्षक श्री.नंदकुमार पवार ( पुणे ), गझलकार श्री.बबन धुमाळ,( पुणे ) , साहित्यिक डॉ. गंगाधर रासगे व सौ. रासगे (पुणे) , प्रा. दामोदर मोकाशीर, श्री. जे. पी.वाडेकर आणि सौ.मनीषा वाडेकर (पुणे) ; सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. सुधाकर आगरकर आणि सौ.शोभा आगरकर, कवयित्री व निवेदिका सौ. किरण लाखे, कवयित्री प्राची कुलकर्णी तसेच साहित्यिक बाळकृष्ण अमृतकर व सौ.अमृतकर तसेच रसिक उपस्थित असणार आहेत.
संमेलनात सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून त्याचे संयोजन सौ उज्वला जगताप (पुणे) व किरण लाखे, डॉ . उषा भोईटे पवार ,प्राची कुलकर्णी या करणार आहेत. शोभा धामसकर (गोवा) या नृत्याविष्कार सादर करणार आहेत. एकदिवसीय साहित्य संमेलना बरोबरच काठमांडू पोखरा, पशुपतीनाथ मंदिर व नेपाळ मधील प्रेक्षणीय स्थळे यांच्या पर्यटनाचा आनंदही सर्व साहित्यिक व रसिक यांना घेता येणार आहे.