Uncategorizedआपला जिल्हाआपला तालुकाचालू घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

” रासप ” ला रामराम करत प्रा.सतिश कुलाळ यांचा शिवसेनेत प्रवेश

माळशिरस : राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी आपली ओळख कामातून निर्माण केले असे युवक नेते प्रा.सतीश कुलाळ यांनी शिवसेना नेते लक्ष्मण हाके सर याच्या मार्गदर्शनाखाली सहकारी मित्र सचिन मलगुंडे, प्रा.शंकर शिंदे,अनिल कायगुडे पाटील,धनाजी लकडे आदींनी मातोश्री वरती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे च्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, प्राध्यापक लक्ष्मण हाके व मित्रपरिवार उपस्थित होते.

यावेळी प्रा.कुलाळ शिवसेना प्रमुख उद्धव साहेब आदित्य साहेब वरून देसाई साहेब यांच्या नेतृत्वात व प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संघटनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांचा फौजफाटा उभा करून शिवसेनेला ताकद देण्याचा काम आगामी काळात करणार आहोत.भाजपाचे केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांचा कारभार राजा आणि प्रजा असा चालू आहे.

  देशाची वाटचाल अराजकतेकडे चालु असून दिल्ली महाराष्ट्र सोबत सुडाने वागतेय.पण या महाराष्ट्राच्या माती चा इतिहास आहे परकीय आक्रमने चालून आली. हा सह्याद्री दिल्ली च्या तक्ता पुढे कधी झुकला नाही. निधड्या छातीची ढाल करून समोर उभा ठाकला आहे.. सत्तेचा माज उतरवण्यासाठी आदित्य ठाकरे साहेब व हाके सराच्या नेतृवांत संपूर्ण महाराष्ट्र भर युवकांचा फौज फाटा उभा करणार असे सूतोवाच प्रा.कुलाळ यांनी पक्ष प्रवेशानंतर प्रसार माध्यमापुढे व्यक्त केले. आगामी काळात ‘गाव तिथे शाखा’ निर्माण करणार असून जिल्हा परिषद,पंचायत समिती सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढणार पक्षाला ताकद देण्याचे काम करणार आहोत असे यावेळी सांगितले.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button