राजकारण

माळशिरसचे नगरसेवक श्री.कैलास वामन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

माळशिरस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विकास आघाडीचे माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक मा.कैलासभाऊ वामन यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते अॅड. दादासाहेब पांढरे पाटील, मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या उपस्थितीत पत्रकार तथा समाजसेवक मोहसिन शेख यांच्याकडून माळशिरस संपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
गत पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत निर्विवाद विजयाच्या जल्लोषानंतर प्रथमच वाढदिवसाचे औचित्य साधत माळशिरस शहरात नगरसेवक श्री.वामन यांचा अनेक सामाजिक,राजकीय स्तरातून सत्कार व शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला जात आहे.या सत्कार समारंभ प्रसंगी मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे राज्य संपर्क प्रमुख शाहबाज भाई शेख शहराध्यक्ष अजीमभाई मुलाणी,नौशाद शेख आदी उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button