आपला जिल्हाआपले शहरमनोरंजनमहाराष्ट्रसमाजकारण

संग्रामनगरच्या गणेशोत्सव मंडळात बालकलाकारांकडून विविध वेशभूषांचा देखावा सादर

संग्रामनगर : ओम श्री साई गणेश उत्सव मंडळ संग्राम नगर ६५ बंगला येथील गणपती स्थापना १९९० पासून मंडळ कार्यरत असून दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत महाप्रसाद पूजा मंडळाचे दररोज सूर्योदय व सूर्यास्त नंतर वेगवेगळ्या गणेश भक्तांकडून आरती करण्यात येते. या मंडळाचे मार्गदर्शक तुकाराम साळुंखे पाटील, विनोद आंग्रे,सादिक शेख, बापूराव सूर्यवंशी, दळवी सर, महादेव अंधारे दादा, ग्रामपंचायत सरपंच संग्रामनगर उपसरपंच व सर्व सदस्य यांचे सर्वांचे सहकार्याने गणरायांची आगमनापासून १० दिवस विविध प्रकारे पूजाअर्चा करून लहान आबाल वृद्धांनी गणपतीच्या पूजेसाठी दोन वेळा आरतीला उपस्थित राहतात.


   रात्री सर्व लहान मुलांनी विविध रूपे घेऊन ६५ बंगल्यातून प्रभात फेरीसारखी फेरी काढून जय जवान जय किसान शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली सावित्रीबाई फुले महात्मा फुले की जय घटना संविधान आंबेडकर की जय भारत माता की जय जय हिंद जय जवान जय किसान इत्यादी घोषणा करून लहान मुलांनी आपल्या कलेचे कौशल्य मंडळांनी दाखवून दिले .तसेच वासुदेव ,भारतीय जवान,शिवाजी महाराज,जिजाऊ माता, सावित्रीबाई फुले, गणपती, वारकरी,मावळा,कोल्हापूरची माता,शक्तिमान,वेताळ,नरसिंह,श्रीकृष्ण, राधा,हनुमान इत्यादी वेशभूषा बालकलाकारांनी सादर करत कला दाखवली ; याबद्दल जय हिंद संघटनेच्या वतीने  बालकलाकारांचे कौतुक करण्यात आले.


   या मंडळाचे अध्यक्ष साईराम साळुंखे पाटील, उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी, खजिनदार देशमाने नमोकार, संकेत चक्रे, जयसिंग मोहिते पाटील विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ चे दरवर्षी सहकार्य लाभते सर्व संग्रामनगर मधील भाविक भक्तांने महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाचे मार्गदर्शक अरुण पाटील, महामुनी जोशी कार्यकारी मंडळाचे सदस्य यांनी सर्वांनी महाप्रसादासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button