आपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरमहाराष्ट्रशैक्षणिक

हिंदी भाषा सर्व धर्मीयांना एकतेच्या सूत्रात बांधणारी भाषा – प्रा. बापूसाहेब दळवे

अकलूज : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी सोलापूर जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रमुख बापूसाहेब दळवे तसेच बँक ऑफ इंडिया शाखा माळेवाडी अकलूजचे असिस्टंट मॅनेजर प्रदीप जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मातृभाषेबरोबरच राष्ट्रभाषा हिंदी किती महत्त्वाची आहे हे सांगत विद्यार्थ्यांनी एकमेकांशी हिंदीमध्ये सुसंवाद साधावा असे आवाहन केले. मान्यवरांच्या शुभहस्ते हिंदी साहित्यकार प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेत गीत गायन, सुंदर हस्ताक्षर, निबंध लेखन, हिंदी वक्तृत्व स्पर्धा व काव्य वाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या अनुभव ठोंबरे,भूमिका कारमकर,श्रीराज मगर,भूमी म्हमाणे, नागनाथ नरोटे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बापूसाहेब दळवे यांनी आपल्या भाषणात हिंदी साहित्य, साहितीक व हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रदीप जाधव यांनी बॅंकेचे कॅशलेश व्यवहार ,नवीन खाती उघडणे व एकूणच बॅकेच्या व्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थी मनोगतात इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी भूमिका कारमकर हिने हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. शिक्षक मनोगतामध्ये भारत जाधव यांनी हिंदी हीच भारताची राष्ट्रभाषा का याविषयी आपले विचार व्यक्त केले .


सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिला धाईंजे यांनी केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक भारत चंदनकर,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी किरण सुर्यवंशी, बिभीषण जाधव,गणेश जाधव,धन्यकुमार साळवे व संगीत शिक्षक बाळासाहेब झांबरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार उच्च माध्यमिक हिंदी विभागाचे प्रमुख बलभीम काकुळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button