महाराष्ट्रराजकारण

रा.काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे नुतन प्रदेश संघटक सचिव साळुंखे यांचा झंझावात दौरा

अकलूज : देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा  शरदचंद्रजी पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयवंतराव पाटील,आ.रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष जयदेव गायकवाड, उपाध्यक्ष अशोकदादा गायकवाड यांच्या आदेशानुसार जय हिंद कल्याणकारी महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव तुकाराम साळुंखे पाटील यांचा राज्यभर झंझावात दौरा होणार आहे. ह्या दौरात पश्चिम घडशी संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाब शेठ जाधव मुंबई यांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूर महादेवाचे दर्शन घेऊन दौर्यास सुरूवात होणार आहे.


     तद्नंतर हा दौरा फलटन,सातारा,सांगली,कोल्हापूर,पुणे, मुंबई,शिर्डी,अहमदनगर,सोलापूर,पंढरपूर,खरसुंडी म्हसवड, पंढरपूर,जेजुरी,अकलूज येथे शेवट होणार आहे. या दौर्यास प्रदेश कार्याध्यक्ष घडशी समाज संघटना गुलाब शेठ जाधव (मो.नं ९५२७८६१५८८), कोल्हापूर जिल्हा संघटक चंद्रकांत कदम (मो.नं.९८२३२३३६१२), सोलापूर जिल्हा अध्यक्ष पप्पू वनारे (मो.नं ९६८९२८६२८४),सांगली जिल्हा कार्याध्यक्ष नामदेव धुमाळ (मो.नं ९६२३२७८३२०), सातारा जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश हनुमंत भोसले (मो.नं ९८३४३६३९६४), पुणे जिल्हा संघटक अध्यक्ष संतोष पवार (मो.नं ८५५४९५६०५५ ), शिर्डी अहमदनगर येथील पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तोबा वाडेकर (मो.नं ८८०५९४६२१७ ),घडशी समाज ओबीसी आरक्षण समिती सचिव सुनील दादा पवार फलटण (मो.नं ८८३००८६९४८) यांचे सह दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी पासून जिल्हा दौरा करून घडशी समाज संघटनाच्या सामाजिक अडीअडचणी विचारात घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत.

पक्ष संघटनांबरोबर समाज संघटनांना एकीची आवश्यकता आहे; याकरिता हा दौरा आयोजित करण्यात आले असल्याचे सचिव तुकाराम साळुंखे यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच समाजाच्या अडचणी निवारण करण्यासाठी  शासकीय प्रलंबित मागण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. ही बैठक प्रत्येक जिल्हा तालुका विश्रामगृह शासकीय य सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई शिर्डी येथे आयोजित केले. जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज कल्याणकारी संघटनेच्या वतीने सर्व युवक कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहावर उपस्थित राहून आपले विचार, समाजाच्या अडीअडचणी मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. 

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button