आपला जिल्हाआपला तालुकाकृषीविषयकराजकारण

केंद्राकडून निरा देवघर प्रकल्पास हिरवा कंदील ; मार्चपर्यंत कामास सुरुवात- खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर

फलटण (युवापर्व) : केंद्रीय जलसंपदा विभागाच्या अर्थ व गुंतवणूक समिती ची दिल्लीत दि. ३/१० /२०२३ रोजी बैठक संपन्न झाली .या बैठकीस सुश्री देबश्री मुख़र्जी, सचिव जलशक्ति मंत्रालय, भारत सरकार, उदय चौधरी (निजी सचिव जलशक्ति मंत्री भारत सरकार) , महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता गुनाले, नीरादेवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कोडुलकर आदी उपस्थित होते. हा प्रकल्प केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला केंद्र शासनाचे अनुदान प्राप्त होणार असल्याची माहिती खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.

तसेच या प्रकल्पास राज्य शासन ४०% अनुदान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मंजुर केले आहे. राज्य सरकारने स्वतःचा वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला व त्याचे प्रत्यक्षात टेंडर सुरू झाले व लवकरच काम सुरू होणार आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने खा.नाईक-निंबाळकर यांनी आभार मानले आहे.हा एकूण प्रकल्प ३९६७ कोटी रुपयांचा आहे. आता हा प्रकल्प या वर्षाच्या मार्च अखेर टेंडर प्रोसेस होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. केंद्र शासनाकडून याकरता ६०% निधी उपलब्ध होणार असल्याने लाभक्षेत्रातील माळशिरस तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवले जाणार व पंढरपूर, सांगोला तालुक्यातील या नव्याने लाभक्षेत्रात समावेश झालेल्या कायम दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button