
अकलुज (युवापर्व) : जनशक्ती परिवर्तन विकास आघाडी,तहसिल कार्यालय माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त रेशनकार्ड संबंधित सर्व अडचणी व विविध शासकीय दाखल्यांचे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अकलुज शहरातील विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी या एकदिवसीय शिबिराचा लाभ घ्यावा ; असे आवाहन संयोजक तथा समन्वयक मोहसिन शेख यांनी केले आहे.

अकलूज शहरातील नागरिकांनी जि.प.किल्ला शाळा,अकलूज नगरपरिषद येथे दि.१८ मे २०२३ रोजी स.१०.३० ते सायं. ०४.३० वा.पर्यंत हे शिबीर सुरु आहे. यामध्ये रेशनकार्डामध्ये नविन नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे, दुबार व विभक्त रेशनकार्ड, रेशनकार्ड आधार लिंक करणे , शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्न ,वय अधिवास (डोमिसाईल), जातीचा दाखला,नाॅन क्रिमीलेयर दाखल्यांचा समावेश आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजना शासकीय नियम व अटींच्या पुर्ततेवर लाभ मिळतील. निराधार व विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ मिळवून देण्यात येणार आहे. तसेच असंघटित कामगार यांच्याकरिता ई-श्रम कार्ड नोंदणी करण्यात येणार आहे. तरी शहरातील गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्यावा.