
बारामती(युवापर्व) : दि.०९ फेब्रुवारी २०२३ रोजी बारामती शहरामध्ये हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चा मधील दोन प्रमुख मागण्या आहेत. एक म्हणजे लव्ह जिहाद विरुद्ध कायदा करा दुसरी म्हणजे धर्मांतरण विरोधी कायदा करा या दोनीही मागण्या संविधानाला धरून नाहीत म्हणजे संविधान विरोधी आहेत. संविधानातील कलम १९ ने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे तर कलम २१ ने आपल्या इच्छे प्रमाणे जगण्याचे व आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे तसेच कलम २५ ने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. यानुसार कोणताही नागरिक कोणताही धर्म, जात स्वीकारू शकतो. कोणत्याही धर्माचा प्रचार प्रसार करू शकतो आणि ही कलमे मूलभूत हक्कामधील कलमे आहेत आणि भारतीय संविधानातील कलम १३ नुसार मूलभूत हक्कावर गधा येणारे कायदे करता येणार नाहीत असे म्हणले आहे . मग हे सर्व असताना मोर्चा मध्ये लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी मागण्या करण्यात आल्या आहेत ह्या मागण्यान मधील कायदे करायचे असतील तर भारतीय संविधानात बदल करावा लागेल आणि भारतीय संविधानात बदल करण्यास वंचित बहुजन आघाडीचा विरोध असल्याने या संविधान विरोधी मागण्याचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध केला आहे.

या मोर्चामध्ये कालिचरण महाराज व इतर व्यक्तीने जाती-जातीत धर्मा-धर्मात तेढ निर्माण केली किंवा कोणत्याही जातीबद्दल बेताल वक्तव्य केली तर कालिचरण महाराजला बारामतीच्या बाहेर जाऊ देणार नाही ; असे विधान वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब यांनी केले. यावेळी मंगलदास निकाळजे पुणे जिल्हा महासचिव यांनी या मागण्या कशा संविधान विरोधी आहेत हे सांगितले.यावेळी जिल्हाचे संपर्क प्रमुख ऍड वैभव कांबळे, बारामती शहर अध्यक्ष रियाज खान, जितेंद्र कवडे, सागर गवळी, आनंद जाधव, विनय दामोदरे, ऍड संतोष कांबळे, दिनेश सोनवणे कार्यकर्ते उपस्थित होते.