मुस्लिम समन्वय समितीच्या जिल्हा,तालुका व गावनिहाय पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नौशादभाई मुलाणी यांची वर्णी

अकलूज (युवापर्व) : महाराष्ट्र राज्य मुस्लिम समन्वय समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी टाईम्स ९ चे संपादक नौशादभाई मुलाणी यांची निवड प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी माळशिरस तालुका सहसंघटक पदी मिराज तांबोळी, यशवंतनगर अध्यक्ष पदी इम्रान शेख, खंडाळी अध्यक्ष पदी जावेद तांबोळी उपाध्यक्ष पदी इकबाल शेख यांची जिल्हा, तालुका व गावनिहाय निवडी ह्या अकलूज येथे पार पडल्या . सदरची निवड प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाध्यक्ष सलिमभाई मुलाणी यांनी केली.

सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यामध्ये मुस्लिम समन्वय समितीचा निवडीचा झंझावात सध्या जोरात सुरू आहे. जिल्हा,तालुका व गावनिहाय वाढती संघटनात्मक बांधणीतून सामाजिक हितार्थ मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ -युवा कार्यकर्ते जुडत आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकिय विकास साधण्याकरता समितीचे ध्येय धोरण घरोघरी जाऊन पोचवण्यात येणार असल्याचे मोहसिन शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना थोडक्यात सांगितले.

फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारास प्रेरित होऊन विविधतेत एकता निर्माण करून विविध सामाजिक प्रश्न शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून सोडवणे हाच महत्त्वाकांक्षी उद्देश असल्याचे समितीचे प्रवक्ता रियाज मुजावर यांनी मत व्यक्त केले. यावेळी निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा समितीकडून सत्कार करताना अॅड. दादासाहेब पांढरे पाटील, नगरसेवक कैलास वामन, रियाज मुजावर, मोहसिन शेख, अकलूज शहराध्यक्ष समिरभाई काझी, फारुक शेख, माळशिरस शहर अध्यक्ष समीरभाई मुलाणी, पत्रकार रियाज मुलाणी,सुरज पठाण, शाहरुख शेख , सोहेल शेख, सद्दाम पठाण, अन्सार पठाण, आयान तांबोळीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.