Uncategorized

अकलुजमध्ये पैगंबर जयंतीनिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण १५१ रक्तदात्यांचा सहभाग

युवापर्व (अकलूज ) : अखंड विश्वाला शांतता,मानवता व समतेचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विश्वभरात १२ रबिऊल इस्लामिक माह दिन अर्थात ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते. अकलूज शहरात प्रथमच पैगंबर जयंतीनिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.सई भोरे-पाटील , अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

प्रेषित पैगंबर यांची मानवतेची शिकवण अंगीकारत रक्तदानासारख्या सर्वश्रेष्ठ दानातून अनेकांच्या जीवनास हे वरदान ठरू शकते. याच उद्देशातून खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवांची ईद साजरी होईल.शहरातील मुस्लिम समाज बांधवांकडून आयोजित या रक्तदान शिबिरास एकुण १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून रक्त संकलन अक्षय ब्लड बँक माळशिरस चे प्रतिनिधी राजकुमार वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात शिबिर राबविण्यात आले. या रक्तदान शिबिरास काझी गल्ली,बागवान गल्ली,महादेवनगर,राऊतनगर,व्यंकटनगर परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवत विक्रमी रक्तदान केले. यावेळी आयोजकांकडून प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पत्रकार समाजसेवक मोहसिन शेख, मुस्लिम समन्वय समिती अकलूज शहराध्यक्ष समिर काझी, शहर उपाध्यक्ष आलिम बागवान, शहर संपर्क प्रमुख नाजिरहुसेन मोहोळकर,पत्रकार नौशाद मुलाणी,मदिना मशिदीचे मुख्तारभाई कोरबू ,मोहिद्दीन शेख,वसिम पटेल,आयान तांबोळी,बख्तियार पठाण जामा मशिदीचे भैय्या माढेकर,मोहसिन बागवान,इम्रान बागवान,जुबेर बागवान,मतीन बागवान,मक्का मशिदीचे इन्नूसबाबा सय्यद,अरबिया मदरसाचे आमिर शेख,फारुक शेख,रहिम सय्यद,इन्नूस बागवान,जब्बार शेख सह आदींनी अथक परिश्रम घेतले. तसेच शहरात ईद ए मिलाद निमित्त विविध ठिकाणी धार्मिक प्रवचन व सामुहिक लंगर यासारखे सामाजिक उपक्रम मुस्लिम समाज बांधवांकडून राबविण्यात आले आहेत.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button