महाराष्ट्रराजकारणसामाजिक

अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा घडविणार : शरद पवार

पुणे(युवापर्व) :अल्पसंख्यांक समुदायाच्या महत्वपूर्ण व प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करु असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी #नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी (एनसीएम) च्या वतीने दिल्ली येथे आयोजित बैठकीत अल्पसंख्यांक समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाला दिली.

अल्पसंख्यांच्या घटनातमक अधिकाराची हमी, त्यांच्यावर होणारे हल्ले, लोकप्रतिनिधीत्व तसेच बजेटमध्ये किमान २० टक्क्यांची तरतूद यासह अल्पसंख्यांकांसाठी विशेष नव्हे तर किमान समान संधी उपलब्ध करुन द्यावी इत्यादी अल्पसंख्यांकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पवार यांची त्यांचे दिल्ली येथील निवासस्थनी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी शरद पवार यांनी अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांबाबत सहमती दर्शवत त्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच सदर प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत शक्य ते करण्याचे आश्वासन दिले.

सदर शिष्टमंडळात ख्रिस्ती धर्मगुरु थॉमस बिशप डाबरे, माजी अप्पर पोलीस महासंचालक अब्दुर्र रहेमान, डॉ. सिध्दार्थ धेंडे, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, लुकस केदारी आरसीएस अध्यक्ष, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पिरजादे, जुबेर मेमन, अल्ताफ पिरजादे तसेच दिल्ली येथील फादर मायकल आदि मान्यवर सहभागी झाले होते.

अब्दुर्र रहेमान यांनी अल्पसंख्यांकांना भेडसावणारे प्रश्न व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. बिशप डाबरे यांनी धर्मनिरपेक्ष तत्वांचा अंगिकार करण्यासाठी आपण विशेष मोहीम घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. सर्व जाती धर्माच्या लोकांना घटनेने दिलेले सर्व अधिकार मिळवून देण्यासाठी सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी असे मत डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी व्यक्त केले.

दरम्यान अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांवर विशेषतः राज्य सरकार व केंद्र सरकारच्या बजेटमध्ये अल्पसंख्यांक समुदायासाठी २०टक्क्यांची तरतूद करावी यासाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी (एनसीएम) च्या वतीने देशभर कार्यक्रम राबवण्यात येत असून, दिल्ली येथे सर्व पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींचे याच मुद्यांवर राष्ट्रीय संमेलन घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button