मनोरंजनमहाराष्ट्र

तांत्रिक अडचणीमुळे “अहम” हा मराठी चित्रपट ९ जूनला राज्यात प्रदर्शित होणार

अकलूज (युवापर्व) : इमानदार पत्रकाराचे जीवनावर आधारित अहम चित्रपट हा १२ मे ऐवजी ९ जूनला प्रदर्शित होणारा असल्याची माहिती निर्माता योगेश घोलप यांनी यावेळी दिली. नुकताच काही दिवसांपूर्वी अकलूज येथे अहम चित्रपटाचा टिझर प्रदर्शित सोहळा पार पडला. अहम मराठी चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांत मोठी उत्सुकता झाली होती. परंतु चाहत्यांनी असेच प्रेम व चित्रपट पाहण्याची उत्सुकता पाहता हा चित्रपट ९ जूनला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अहम चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल समाज माध्यमात वडार समाजाने त्यांच्या बोली भाषेतील संभाषणावर आक्षेप घेतला आहे का ? असा सवाल केल्यानंतर याबाबत निर्माता घोलप यांनी कसल्याही प्रकारची भावना चित्रपटातून आम्ही दुखावली नसल्याचे स्पष्ट केले. तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने केवळ २८ दिवस हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. मराठी चित्रपटावर प्रेम करणाऱ्या रसिका त्यांनी संयम ठेवावे व ९ जूनला चित्रपट पाहण्यास आवर्जून यावे ; असे आवाहन निर्माते घोलप यांनी केले.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button