आपले शहरशैक्षणिकसमाजकारण

शिवजयंती,तुकाराम महाराज बीज व ग्रामदैवत राजेबागस्वार बाबा ऊर्स निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या-पेन वाटप

अकलूज(युवापर्व) : शिवजयंती,तुकाराम महाराज बीज व ग्रामदैवत राजेबागस्वार बाबा यांच्या ऊर्स निमित्ताने शहरातील मुलामुलींची शाळा नं.१ व ३ येथिल शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पेन वाटपाचा कार्यक्रम दि.१३ मार्च रोजी कौलारू शाळा बागवान गल्ली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन हजरत टिपू सुल्तान यंग ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते.

सालाबादप्रमाणे प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही करत आहे. आगामी शालेय वर्षात शहरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना शालेपयोगी साहित्य वाटप करून पालकांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होईल . तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शालेय वर्षाच्या सुरवातीस आरोग्य शिबिराची राबवण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी ब्रिगेड अध्यक्ष मोहसिन शेख यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेशभाऊ गंभीरे, राष्ट्रवादी युवक ता.उपाध्यक्ष जाकिर शेख,काँग्रेसचे शशिकांत भोसले,ब्रिगेड उपाध्यक्ष इन्नूस बाबा सय्यद, कार्याध्यक्ष फारुक शेख, खजिनदार समीर काझी,मोहिद्दीन शेख आदी उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्र प्रमुख जाधव सर,मुख्याध्यापक सरतापे सर,सौ.खरात मॅडम व इतर सहशिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तांबोळी सर यांनी मानले.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button