आपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरमहाराष्ट्र

उत्कृष्ट अभियंता सन्मानपत्रक देऊन श्री. गोविंद कर्णवर-पाटील यांचा गौरव

अकलूज : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन म्हणजेच १५ सप्टेंबर हा दिवस भारतभर “अभियंता दिवस” म्हणून अभिमानाने साजरा केला जात आहे. त्याचे औचित्य साधून दि.२७ सप्टेंबर रोजी सा.बां.विभागात शासकीय सेवा बजावतांना केलेल्या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन अभियंता श्री.गोविंद मल्हारी कर्णवर पाटील  शाखा अभियंता, सा. बां. विभाग,अकलूज यांचा सोलापूर येथे सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला.

तसेच ही सेवा बजावत असतांना कामातील निष्ठा, शिस्त, सामाजिक आस्था, सहकारी व जनतेचे सहकार्य या बळावर,सर्वमुखी गुणी अभियंता म्हणून नाव लौकिकास पात्र ठरल्याने श्र.कर्णवर पाटील यांना  उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरविण्यात आले आहे. आपण शासकिय सेवा ही अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहात. त्यांची आजपर्यंत शासन सेवेत करीत असलेली सेवा ही खरोखरच कौतुकास्पद असून त्यांच्या सेवाकार्याची दखल घेत सा.बांधकाम मंडळ, सोलापूर यांच्या वतीने हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाचे शाखा अभियंता श्री.गोविंद कर्णवर-पाटील  यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button