आपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरमहाराष्ट्रशैक्षणिकसमाजकारण

स्पर्धात्मक जीवनात जिद्द,चिकाटी,कष्टाशिवाय पर्याय नाही – डाॅ.दिलीप स्वामी

अकलूज : अकलूज येथील स्मृतीभवन येथे तालुक्यातील १० वी, १२ वी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या तसेच स्पर्धा  परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थांसाठी ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेच्यावतीने मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन कार्यक्रम सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी,अकलूज उपविभागीय पो.अधिकारी बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, माळशिरस पंचायत समितीचे बी.डी.ओ. विनायक गुळवे, दि लाईन अकॅडमी पुणेचे संचालक उत्तम पवार, प्रा. इंद्रजीत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

  आई,वडिल व गुरुच आपले खरे हितचिंतक आहेत. त्यांना कधी फसवू नका, त्यांना सर्व माहिती असते. आपण सर्वसाधारण कुटुंबातून आलेले आहोत. त्यामुळे आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. आपल्याला काय हव आहे ते ध्येय मनी बाळगून ठेवा. जिद्द,चिकाटी व कष्टाला पर्याय नाही, कष्ट आणि संयम फार महत्वाचा असतो. कोणीही सहज मोठे होत नाही यासाठी खूप मेहनत करावी लागते. वेळेला महत्व द्या, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांना केले.

यावेळी विनायक गुळवे, बसवराज शिवपूजे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. इंद्रजीत यादव यांनी पर्सनल डेव्हलपमेंट बाबत थोडक्यात  उदाहरणासह सखोल माहिती दिली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक माजी पी.एस.आय, नायब तहसीलदार, दि लाईन अकॅडमी पुणेचे संचालक उत्तम पवार यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना कशाला महत्व द्यायचे,अभ्यास कसा करायचा याविषयी माहिती देऊन १० वी, १२ वी, पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच बॅक बेंचर आणि विवाहित महिला याना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.

यावेळी निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकमोघे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंतामण डाके, सोमनाथ कर्णवर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर तथा माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, समाज कल्याण निरीक्षक तथा माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे सचिव सुनिल कर्चे, सहा.पो निरीक्षक सोलापूर शहर तथा प्रमुख अधिकारी प्रतिष्ठान महादेव देशमुख, ग्रामसेवक तथा अधिकारी प्रतिष्ठानचे सहसचिव हनुमंत वगरे,सार्वजनिक बांधकाम विभाग करकंबचे उपअभियंता धनंजय पाटील, पोलीस नाईक तथा प्रतिष्ठान प्रसिद्ध प्रमुख माणिकराव म्हेत्रे, सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता गोविंद कर्णवर-पाटील, सहा. मोटार वाहन निरीक्षक हनुमंत कोळेकर, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजच्या शाखा अभियंता कोमल माने, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे शाखा अभियंता सुरज ठवरे, कृषी अधिकारी संदीप घुले, कृषी सहायक संभाजी वाघमाडे, कृषी अधिकारी योगेश चव्हाण,कृषी सहायक अमित गोरे,तलाठी सचिन पाटील, ग्रामसेवक संतोष पानसरे, मल्हारी लोखंडे, तलाठी अनिता वाळुंजकर-ताकभाते तसेच विद्यार्थी व शिक्षक संख्येने उपस्थित होते. तहसीलदार, दि लाईन अकॅडमी पुणेचे संचालक उत्तम सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरसिंह पाटील यांनी तर पवार यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा तयारी सूत्रसंचालन धनंजय माने यानी कले.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button