आपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरचालू घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रशैक्षणिकसमाजकारण

अकलूज प्रांत कार्यालयावर बहुजन सत्यशोधक संघाचा निषेध मोर्चा

अकलूज : बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने अकलूज प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.राजस्थानमध्ये ९ वर्षाच्या मुलाने मटक्यातील पाणी पेला म्हणून त्या कुमार इंद्रजीत मेगवाल या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. या क्रूर,अमानवी,निंदनीय घटनेचा बहुजन सत्यशोधक संघ राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी निषेध व्यक्त केला.तसेच मातंग समाजातील जनार्दन कासारे यांची निर्घृण हत्याकांड करणाऱ्या जातीवादी गावगुंडांवर ३०२ /ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. संविधानाची १०० टक्के अंमलबजावणी न करण्यामुळे जातीवादी लोकांकडून मागासवर्गीयांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढत आहे. एससी, एसटी च्या लोकांवरती ३९५ सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. या शासनाचा जेवढा निषेध करेल तेवढा कमी आहे व ओबीसी ची जातनिहाय जनगणना न करणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केली जातील असे ते म्हणाले.

डॉ. कुमार लोंढे म्हणाले की बहुजन समाजाने जागृत होऊन युवकांनी फुले शाहू आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून राष्ट्रीय आंदोलन निर्माण करणे गरजेचे आहे. इंदु मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची उंची कमी केली असली तरी बाबासाहेबांच्या विचारावर येथील युवक क्रांती केल्याशिवाय राहणार नाही असे डाॅ.लोंढे म्हणाले. पेट्रोल डिझेल खाद्यजन्य पदार्थांच्या किमती वाढवून बहुजनाला गुलाम बनवण्याचे हे जातीवादी षड्यंत्र आहे,राशन कार्ड धाराकांवरती जाचक आटी लावून रेशन बंद करण्याचे षडयंत्र आहे असे महेंद्र लंकेश्वर म्हणाले.

केंद्र सरकारने शालेय वस्तू व पुस्तकावर जीएसटी लावून बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू केले आहे. केंद्र सरकारने हॉस्पिटल मध्ये स्टेटमेंट फलक न लावणाऱ्या हाॅस्पिटलवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी असे प्रदीप सरवदेंनी मत व्यक्त केले.यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब पालखे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव (बापू) लोंढे, नेते भैय्यासाहेब बाबर,रहीम मोहम्मद भाई शेख, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नितीन वाघमारे, टेंभुर्णी शहराध्यक्ष रोहित जगताप, संतोष जानराव, संजय बामणे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button