आपला जिल्हामहाराष्ट्रराजकारण

रा.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

अकलूज : रा.काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांचे विश्वासू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शंकर नाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रा.काँग्रेसच्या विविध सेलकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सचिव तुकाराम साळुंखे पाटील,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब गायकवाड यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील मोहिते – पाटील विरोधी वादळी नेतृत्व असलेल्या या नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रा.युवक काँग्रेस,ओबीसी सेल,विविध सामजिक संघटनांनी प्रत्यक्षपणे भेट देत शुभेच्छा देण्यात आले. राज्यभरातून अनेक राजकिय नेतेमंडळींनी दूरध्वनी,समाज माध्यम,एसएमएस व व्हाट्स अप द्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.अशा मातब्बर नेतृत्वास युवापर्व न्यूज च्यावतीने वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button