आपला जिल्हामहाराष्ट्रराजकारणसमाजकारण

शिवसेनेच्या वचननाम्या प्रमाणे ३०० युनिटमध्ये ३०% दर कपात व २०० युनिट वीज मोफत द्या – आप (माळशिरस)

अकलूज : कोरोना कालावधीत महावितरणकडून लॉकडाऊन असताना देखिल दि. १ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात सर्वाधिक महागडी वीज ही राज्यात आहे. राज्यात भाजपा व शिवसेना शिंदे गट आल्याबरोबार आपणही २०% पर्यंत या महिन्यांपासून भाव वाढ केली असल्याने आम आदमी पार्टी माळशिरस तालुकाध्यक्ष इंजि.संदिप इंगोले यांनी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन पत्राद्वारे आश्वासनांना उजाळा आठवण करून देत वीज दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त केला.याबाबत संवैधानिक पध्दतीने मा. तहसिल कार्यालय माळशिरस येथे आंदोलन करून मा.मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या द्वारे निवेदन पत्र देण्यात आले.

शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकां पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर महाविकासआघाडी सरकार असतांना मागच्या दोन वर्षात बीजेपी व स्वता सध्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ कमी करने व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केलेत.

दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील श्री भगवंत मान सरकार ने १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे.राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही सावकारी लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे.

राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली त्वरित मागे घ्यावी.
आपण खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी.वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे.राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी या निर्णयाच्या प्रतीक्षेत राज्याची जनता आशावादी आहे. अशां विविध मागण्या आपकडून मा.तहसिल कार्यालय,माळशिरस येथे  आंदोलन करण्यात आले.

राज्यात सध्या भाजप व शिवसेना शिंदे गटाची सरकार आली आहे.तसेच आपण राज्यातील जनतेला न्याय देण्याबाबत विश्वास देत आहात.मागिल महाविकासआघाडी सरकार असतांना फडणवीस ह्याच मागण्या करीत होते, आता तेही आपल्या सोबत सरकार मध्ये आहेत. त्यामुळे या गंभीर मुद्द्याकडे स्वतः लक्ष देवून खालील मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. अन्यथा आजच्या आंदोलनापेक्षा मोठ्या संख्येने आम आदमी पक्षा कडून रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येणार आहे.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button