आपला जिल्हामहाराष्ट्र

औरंगाबादच्या युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी अरबाज पठाण यांची निवड

सिल्लोड : महाराष्ट्र राज्य मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून विविध राजकिय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना समितीकडून नियुक्ती पत्र जारी करत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यात युवकांची मोट बांधून समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे अरबाज पठाण यांची निवड औरंगाबाद युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे मुख्य कार्यालय माळशिरस येथून प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियुक्ती पत्रक जाहिर करण्यात आले आहे. या पत्रात समितीकडून सर्व समाजातील युवाशक्ती एकसंध करत त्यांचे भविष्यात येणारे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील रहावे ; अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीने नुतन युवा जिल्हाउपाध्यक्ष पठाण यांना पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button