आपला जिल्हाआपले शहरमहाराष्ट्रराजकारण

निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी अकलूज शहरची बैठक संपन्न

अकलूज : अकलूज शहरात ग्रामपंचायतीपासुन नगरपरिषद होईपर्यंत विकासाचा नुसताच देखावा उभा केलेला असुन आजही सर्वसामान्यांना व कष्टकऱ्यांना स्वच्छता, रस्ते विकास, रोजगार, सामाजिक उन्नती, महिला सबलीकरण, महिला सुरक्षितता, आर्थिक व सामाजिक न्याय यासारख्या महत्वाच्या प्रश्नांपासून आजही वंचित रहावे लागत आहे. प्रस्थापितांनी अकलूजकरांच्या जीवावर केवळ आपली राजकीय पोळी भाजत स्थानिकांना विकासाच्या विविध संधींपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान आजतागायत चालविले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडी वेळोवेळी इथल्या सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी व अडी-अडचणीसाठी आवाज उठवित आहे व विविध प्रश्न मार्गी लावत आहे. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले असुन यासाठी विविध प्रभागाची बांधणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर अकलूजमधील विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेण्यासाठी तसेच येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक कमिटीचे बाबासाहेब कांबळे,उत्तम वनशिव,रामभाऊ मरगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर, माळीनगरचे विद्यमान सरपंच व जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप, माळशिरस विधानसभेचे माजी उमेदवार राज कुमार, तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड, ता.संघटक विकास दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूजमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी अकलूज शहरातील विविध समाजघटकांतील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीकडे ओघ वाढल्याचे दिसुन आले. बैठकीला उपस्थित असलेल्या तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असुन इथुन पुढे सर्वांच्या सहकार्याने वंचित बहुजन आघाडीचा लढा अधिक तिव्र करणार असल्याचे तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी सांगितले.

सदर बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे अकलूज शहराध्यक्ष सुनील कांबळे, महासचिव सागर जगताप, उपाध्यक्ष मनोज जगताप, संघटक सूनका जाधव, कुंडलिक कांबळे, युवक ता.उपाध्यक्ष सुजित गायकवाड, युवक शहरप्रमुख सुहास गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,पै.अक्षय चंदनशिवे फाउंडेशनचे प्रमुख आदर्श गायकवाड,निलेश लोखंडे, स्वप्निल लोंढे, दीपक चव्हाण, सुरज चव्हाण, संदीप निंबाळकर, देवा चव्हाण, संदीप चव्हाण व अकलूज शहरातील विविध प्रभागातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button