आपला तालुकासामाजिक

भिमा नदीसह उजनी उजवा व डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची युवा सेनेची मागणी

संगम (युवापर्व) : भिमा नदीत व उजनी उजवा व डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे . संगम येथील चंद्रभागा नदीमध्ये उतरून युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात यावा याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी पंढरपूरच्या पांडुरंगाला ही साकडे घालण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात लवकर लवकर पाऊस पडू दे..!

उशाला धरण , पायथ्याला नदी., बाजूला कालवा.., तरीही गावे पाण्यावाचून उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. उजनी धरण,भिमा नदी व उजवा व डावा कालवा कधी काळी सोलापूर जिल्हासाठी जीवनदायिनी ठरलेली व लाखो एकर शेतीला पाणीपुरवठा करून परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत करणारी नदीचे पात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप कोरडेच पडले आहे. याचा परिणाम शेतकरी तसेच घरगुती व सार्वजनिक विहिरीतील व बोरवेल मधील पाण्याच्या पातळीवर झाला असून सर्वच विहिरी व बोरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. जनावरांची पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत हवालदिल झाला आहे. विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. परीणामी जनता पाण्यासाठी व पाऊसासाठी चंद्रभागेच्या तीरावर वसलेले विठू रायाला साकडे घालतानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी नदीचे पात्र अद्याप कोरडेच दिसून येत आहे. याचा परिणाम शेतातील पिके तसेच पिण्याच्या पाण्यावरही जाणवत असल्याची चर्चा नागरिकांतून करण्यात येत आहे. नेहमी भीमा नदीच्या पात्रात पाणी वाहू लागले किवा नदीचे पात्र भरले की सार्वजनिक विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होऊन पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात लागत असे मात्र यंदा भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून पिकाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.

परीसरातील भीमेच्या पाण्यावर अवलंबून असलेली परिसरातील सुमारे हजारो हेक्टर शेती व नदीकाठच्या गावांच्या पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.ऊस, फळबागा चारा व इतर,पिकांबरोबरच दुष्काळासारखी दाहकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. याचा परिणाम भीमानदी काठालगतच्या शेती शिवारावर व जनजीवनावर झाला आहे.भीमेचे पात्र कोरडे पडल्याने भीमेच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेतातील पिके नदीकाठच्या गावांच्या शेती पीके संपुष्टात चालली आहेत. जर येत्या आठवडाभरात मुसळधार पाऊस न झाल्यास दुष्काळाचे सावट या भागाला निश्चितच सतावणार अशी चिन्हे आहेत.

प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार

पावसाळ्यात उजनी धरणातून भिमा नदीत व कालव्या ला सलग आवर्तन न ठेवता अंतर ठेवून केली असती तर सध्याची पाणी समस्या महिनाभर लांबवता आली असती. परंतु उजनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना आत्ता बसताना दिसत आहे.

परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने स्थानिक प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतवाडीला जीवनदायीनी देणारे उजनी धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालव्या मध्ये सोडले तर नदीचे पात्र भरलेले राहील. याचा परिणाम या भागातील हजारो एकर जमिनीत हाताशी आलेल्या पीकांना होईल. यासाठी प्रशासनाने,मंत्री, खासदार, आमदारांनी या उजनी धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालवयात जर सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर खऱ्याअर्थाने या भागाचा पाणी प्रश्न सुटू शकतो. यासाठी तातडीने या संदर्भात बैठक बोलावून यावर विचारविनिमय करून या धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालवयात सोडण्यासाठी प्रयत्न करावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

यावेळी नामदेव पराडे, दत्ता साळुंखे ,गणेश भिताडे ,सागर साळुंखे, मगन भोई , मुकीद गायकवाड , हरिदास पराडे, देविदास इंगळे, बबन पराडे, लाला भोई ,अशोक भोई, सोमनाथ भोई , महादेव पराडे, गोवर्धन भोई, बापू भोई ,सोमनाथ इंगळे, अर्जुन लांवड ,अंकुश इंगळे , आकाश पराडे , प्रवीण पराडे , विकास भोई , शंभो पराडे , शुभम भोई , गणेश काळे , अण्णा पाटील , अमित भोई , रोहित इंगळे, अक्षय भोई, अक्षय पराडे, अमोल भोई, दयानंद इंगळे, अनिकेत पराडे , नितिन ढवळे , अविनाश पराडे, सागर पोराळे इत्यादी शेतकरी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button